Home GR & Circulars राष्ट्रीय तंदुरुस्ती मूल्यांकन योजना-२०२०

राष्ट्रीय तंदुरुस्ती मूल्यांकन योजना-२०२०

Khelo India_National_Fitness_Programme
“फिट इंडिया”
चळवळी अंतर्गत भारत आणि भारतीयांना सन २०२२ पर्यंत तंदुरुस्त बनविण्याचा संकल्प भारत सरकारने केलेला आहे. ‘दैनंदिन जीवनात तंदुरुस्तीचे महत्व वाढविणे’ हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे.

याच चळवळीचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांची तंदुरुस्तीबाबत शालेय स्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे.

कार्यवाही

चाचणीद्वारे प्राप्त झालेली माहिती खेलो इंडिया या App वर अपलोड करावयाची आहे. या संदर्भातील सर्व प्रशिक्षणे online मोडमध्ये या App च्या माध्यमातून घेतली जाईल.


याकरिता प्रथमतः महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांनी आपली नावनोंदणी (Login) खालील पोर्टलवर जाऊन करावयाची आहे.
https://schoolfitness.kheloindia.gov.in/StaticPage/LandingPage.aspx


शाळा नोंदणीबाबतच्या सविस्तर सूचना प्रपत्र-अ व प्रपत्र-ब मध्ये सोबत दिलेल्या PDF व त्याचबरोबर Demo Video मध्ये नमूद केलेल्या आहेत. नोंदणी करण्यापूर्वी ह्या गोष्टी अगोदर काळजीपूर्वक पहाव्यात.
PDF
FIT_INDIA_REGISTRATION_GR_PDF

Demo Video


नोंदणीसाठी अंतिम दिनांक- १५ डिसेंबर २०२०

शाळा व शिक्षकांची यापूर्वी नोंदणी झाली असेल तर पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही

अधिक माहितीसाठी ८१५४०९२३३९ व ९८९९६८३५५७ या क्रमांकावर सकाळी ९.०० व सायं. ६.३० या वेळेत संपर्क साधावा


खेलो इंडिया App आपल्या Android मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/developer?id=Sports+Authority+of+India

खेलो इंडिया App आपल्या IOS फोनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://apps.apple.com/in/app/khelo-india-school-version/id1535425198