Breaking News | Ahilyanagar | Discipline is important in life: ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात बोलताना उदयन गडाख. विद्यार्थ्यांनी कायम जिद्द ठेवली पाहिजे. आयुष्यात यश मिळवायचे असेल, तर शिस्त महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले.
नेवासा : राष्ट्रीय सेवा योजनेतून शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक विकास होतो. विद्यार्थ्यांना या शिबिरातून श्रमसंस्कार मिळत असतात. विद्यार्थ्यांनी कायम जिद्द ठेवली पाहिजे. आयुष्यात यश मिळवायचे असेल, तर शिस्त महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले.
मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन गडाख व श्री त्रिवेणीश्वर संस्थानचे प्रमुख महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच भिवाजी आघाव, अॅड. कल्याण पिसाळ, कल्याण उभेदळ, अण्णासाहेब जावळे, अशोक पिसाळ, मुरलीधर जाधव, प्राचार्य डॉ. अरुण घनवट, आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अरुण घनवट यांनी स्वागत केले. डॉ. नवनाथ आगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गणेश गारुळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. कार्तिकी नांगरे यांनी आभार मानले.
Breaking News: Discipline is important in life














