Breaking News | Ahilyanagar | Internet: इंटरनेटचा वापर अभ्यासासाठी करा. सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करा.
कान्हूर पठार : “इंटरनेटचा वापर अभ्यासासाठी करा. सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. शिक्षणामुळेच ज्ञान आणि सुरक्षित भविष्य घडते.” तसेच “एका हाताने केलेले चांगले काम दुसऱ्या हाताला कळू नये” अशी भावना ठेवून समाजसेवा करावी, असे आवाहन सायबर इंटरनेट सिक्युरिटीचे अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी केले.
पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सायबर जनजागृतीसह शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. या वेळी भालेराव यांनी स्वतः आपल्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्य वाटप केले, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
कार्यक्रमास चंद्रकांत भालेराव, पत्रकार संतोष कोरडे यांच्यासह बबन अडसूळ, मल्हारी कोरडे, रोहित बोहुडे, भानुदास अडसूळ, अंबादास कोरडे, राजू शिंदे, बाळासाहेब कोरडे, बाळासाहेब अडसूळ, शशिकांत अडसूळ, सुखदेव कोरडे, संभाजी आडसूळ, भाऊ अनारसे, बाळासाहेब नरसाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक झावरे बाबाजी, उपाध्यापिका शिंदे मंगल, छाया कराळे, कविता कातोरे, ठाणगे अर्चना अश्विनी जहऱ्हाड, नीलिमा कोरडे, रपाली
अनारसे, मनीषा ठोकळ, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ढवळपुरी (ता. पारनेर) येथील मूळ रहिवासी असलेले भालेराव बंधू हे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने मदत करत असतात. या वेळी ग्रामस्थांच्या हस्ते राजेंद्र भालेराव यांचा सत्कार करण्यात आला.
Breaking News: Use the internet for study














