Home News विद्यार्थ्यांनी उद्योगात करिअर करावे : रोही

विद्यार्थ्यांनी उद्योगात करिअर करावे : रोही

99
0
Ahilyanagar Career Guidance

Breaking News | Ahilyanagar Career Guidance: स्टार्टअप संकल्पना, डिजिटल मार्केटिंग, स्थानिक उद्योगांना चालना देण्याचे मार्ग व नवकल्पनांचे महत्त्व यावर भर देण्याचे आवाहन.

श्रीगोंदा : कोणताही व्यवसाय अगर उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, व्यवसाय नियोजन, भांडवल उभारणी, शासकीय योजना, कर्ज सुविधा तसेच बाजारपेठेतील संधीबाबत अगोदर अभ्यास करावा, निश्चित यश प्राप्त होईल, असा विश्वास सचिन रोही यांनी व्यक्त केला.

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात नवउद्योजकता विकास व समुपदेशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रकाश साळवे होते. रोही यांनी स्टार्टअप संकल्पना, डिजिटल मार्केटिंग, स्थानिक उद्योगांना चालना देण्याचे मार्ग व नवकल्पनांचे महत्त्व यावर भर देण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. हरिभाऊ वाघिरे यांनी स्वागत केले. डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. राहुल गायकवाड, प्रा. अनिल ढवळे, प्रा. ठवाळ, प्रा. फटे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Breaking News: Ahilyanagar Career Guidance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here