Breaking News | Ahilyanagar: पंचायत समिती कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रांच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडून चौकशी.
अहिल्यानगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत चिखली (ता. श्रीगोंदा) येथील नारायण ज्ञानदेव कदम यांच्या विहीर कामावर अंगणवाडी सेविका यांनी खोटी उपस्थिती दाखवून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर श्रीगोंदा पंचायत समितीने चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित प्रकरणात अंगणवाडीसेविकेची प्रशासकीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
याबाबत चिखली येथील महेश भिवसेन झेंडे व इतर ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली होती. तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील मग्रारोहयो कार्यक्रम समन्वयक व पंचायत समिती कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रांच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडून चौकशी करण्यात आली.
चौकशी अहवालानुसार चिखली येथील अंगणवाडी सेविका रोहिणी कदम या चिखली येथे कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे रोहयो अंतर्गत विहीर कामावरील हजेरीपटावर त्यांची उपस्थिती नोंदविल्याचे आढळून आले आहे.
या बाबी गंभीर मानून संबंधित अंगणवाडी सेविकेवर केलेल्या प्रशासकीय कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पंचायत समिती कार्यालयात सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाला दिले आहेत.
Breaking News: Anganwadi workers on Rohyo’s work in Srigondya














