Home News Korthan Yatra: मानाच्या काठ्यांनी कोरठण यात्रेची सांगता

Korthan Yatra: मानाच्या काठ्यांनी कोरठण यात्रेची सांगता

109
0
Korthan Yatra concludes with a procession of honor

Breaking News | Ahilyanagar:   श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवाचा समारोप. (Korthan Yatra).

पारनेर : प्रति जेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवाचा समारोप ब्राम्हणवाडा व बेल्हा येथील मानाच्या काठ्यांनी झाला.

राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त कोरठण खंडोबा देवस्थान गडावर शनिवारपासून तीन दिवस वार्षिक यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पुणे जिल्ह्यातील बेल्हे व ब्राह्मणवाडा (अकोले) येथील मानाच्या काठीने कळस व देवदर्शन घेतल्यानंतर या उत्सवाची मोठ्या भक्तिभावात सांगता झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या भाविकांनी खोबरे, भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली. सोमवारी यात्रेचा शेवटचा व मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी अकरा वाजल्यानंतर भाविकांचा कोरठणला जनसागर लोटल्याने प्रचंड गर्दी झाली. दुपारी खंडोबा चांदीच्या पालखीसह बेल्हा, ब्राम्हणवाडा, अळकुटी, साकुरी, वडगाव तांदळी, राजापूर, माळवाडी, कासारे, कळस येथून आलेल्या खंडोबा पालख्यांची शोभा मिरवणूक निघाली.

सोमवारी दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, तहसीलदार गायत्री सौंदाणे, पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या हस्ते काठ्यांची शासकीय महापूजा होऊन महाआरती झाली. बेल्हे येथील काठीने कळस, तर ब्राह्मणवाडा येथील काठीने देवदर्शन घेतले. त्यानंतर इतर गावांच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका होऊन यात्रेची सांगता झाली. देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, अशोक घुले, सरपंच सुरेखा वाळुंज, खजीनदार कमलेश घुले, सचिव चंद्रभान ठुबे, सहसचिव सुवर्णा घाडगे, माजी अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, तुकाराम जगताप, सुरेश फापाळे, जालिंदर खोसे, अजित महांडुळे, दिलीप घुले, धोंडीभाऊ जगताप आदींनी नियोजन केले.

कोट्यवधीची उलाढाल

कोरठण खंडोबा देवस्थानच्या तीनदिवसीय वार्षिक यात्रोत्सवास पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे येथून लाखो भाविकांनी हजेरी लावली.

यात्रोत्सवात खेळणी, मिठाई, संसारोपयोगी वस्तू, खोबरे, भंडाऱ्यासह पाळणे व गेमिंग झोनसह इतर शेकडो स्टॉल उभारण्यात आले होते. या तीन दिवसांत कोट्यवधींची उलाढाल झाली.

Breaking News: Korthan Yatra concludes with a procession of honor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here