Breaking News | Ahilyanagar: भगवंताच्या नामस्मरणात भक्तांचे संकट निवारण करण्याची अफाट शक्ती. (God).
पुणतांबा: प्रत्येकाने जीवनात परमेश्वराची आराधना, उपासना व नामस्मरण केल्यास परमेश्वराचे आशीर्वाद लाभतात तसेच अन्नदान केल्याने पुण्य प्राप्त होते. भगवंताच्या नामस्मरणात भक्तांचे संकट निवारण करण्याची अफाट शक्ती आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार भागवताचार्य सुरेखाताई महाराज टेके यांनी केले.
पुणतांबा येथे आयोजित प्रवचनात महाराज बोलत होत्या. यावेळी त्यांनी भगवान शिव, श्रीकृष्ण तसेच रामायण व महाभारतातील अनेक दाखले देत प्रवचन केले. डोणगाव येथील लेंभे परिवाराच्या वतीने प्रवचनकार त्यांचा सन्मान करण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट परिसरातील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
मंदिराभोवती आकर्षक रांगोळी काढण्यात आली असून घाट परिसर सजवण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणतांबा गावासाठी दिलेल्या १५ सौर ऊर्जेवरील हायमॅक्सपैकी एक हायमॅक्स कार्तिक स्वामी मंदिराजवळ बसवण्यात आल्यामुळे मंदिर व घाट परिसर प्रकाशमान झाला होता. याप्रसंगी मंदिर सेवा समितीच्या वतीने जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते व विखे पाटील यांचे समर्थक राहुल धनवटे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्तिक स्वामी मंदिराच्या प्रांगणात दर महिन्याला मासिक प्रदोष साजरा केला जातो. चालू घेतले होते. जानेवारी महिन्यात गुरुवारी प्रदोष संपन्न झाला. गुरुवारी सायंकाळी भागवताचार्य सुरेखाताई टेके यांची प्रवचन सेवा संपन्न झाल्यानंतर डोणगाव येथील रहिवासी मनोज लेंभे व सविता लेंभे यांच्या परिवाराच्या वतीने उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्तिक स्वामी भक्त मंडळ, जय बाबाजी भक्त परिवार, मंदिर सेवा दुरुस्ती समिती, शिव महापुराण प्रतिष्ठाण, श्री स्वामी समर्थ सेवेकरी, श्रीराम संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, समस्त भजनी मंडळ, बजरंग दल, ग्रामस्थ भाविक भक्त तसेच विविध मंडळांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात प्रदोष प्रवचन सेवा व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला.
Breaking News: The power to overcome adversity in the remembrance of God name














