Politics | अहिल्यानगर: निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, चांगले फुटपाथ, उद्याने, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा, रोजगार या विषयाची चर्चा व्हावी, असे नागरिकांना वाटते. लोकांचे प्रश्न कसे सोडवले जाणार याची उत्तरे नागरिकांना हवी असतात मात्र, धर्म, भाषा, जात आणि एकमेकांची जिरवाजिरवी या पलीकडे निवडणुका जायला तयार नाही. अरे ला कारे म्हणणे, ठोकाठोकीची भाषा करणे, टोकाला जाऊन राजकारण करणे याच गोष्टी जाणीवपूर्वक आणल्या जातात. कारण सामान्य जनतेच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नावर उमेदवारांना आणि पक्षांना बोलायचेच नसते तर काही प्रश्नही मुद्दामहून प्रलंबित ठेवायचे असतात. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही तुमचा आवाज बनून नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्यांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल विचारणार आहोत.
हा गंजबाजार की, वाहनांचा बाजार ?
शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण आणि जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या कापड बाजारालगतचा हा गंजबाजार सध्या वाहतूक कोंडीने हैराण झाला आहे. येथे शिस्त नावाचा प्रकारच नाही, वाहनचालक रस्त्यातच वाहने लावून खरेदीला जातात. त्यामुळे या ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठीही रस्ता उरत नाही. वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे स्थानिक व्यावसायिकांसह ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक वर्षापासूनची ही समस्या सोडविण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नाही. उमेदवारांना या परिसरातील व्यापान्यांचे मतदान हवे आहे. मात्र, कोडलेल्या बाजारपेठेचा स्वास मोकळा करायचा नाही. अशी परिस्थिती आहे. वाहतूक कोंडीबाबत स्थानिक व्यापा-यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्यापपर्यंत काहीच मार्ग निघालेला नाही.
हा तर… डास निर्मितीचा कारखाना
जुने महापालिका कार्यालय परिसरात मोठे बेग पटांगण आहे. या मैदानाची सध्या कचराकुंडी झाली आहे. येथे बंद पडलेले डंपर, कचरा गाड्यांच्या तुटलेल्या ट्रॉली ठेवल्या आहेत. येथे कचरा टाकला जातो. पावसाळ्यात याच भंगार साहित्यामध्ये पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढतो. महापालिका कार्यालयाशेजारी असलेल्या ठिकाणाची स्वच्छता करण्याची दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिवाची बाजी… तरी येथेच विकणार भाजी
सावेडी उपनगरातील पाइपलाइन रोड हा दळणवळणाचा मुख्य रस्ता. या रस्त्यावर गेल्या सहा ते सात महिन्यांपासून दोन्ही बाजूंनी भाजी विक्रेते दुकाने लावून व्यवसाय करतात. त्यामुळे या स्मयावर सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत वारंवार वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे कधी छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना मोठा प्रास सहन करावा लागाते. या रस्त्याला महापालिकेचे चार प्रभाग जोडलेले आहेत. विक्रेत्यांच्या या अतिक्रमणाबाबत मात्र कुणीच बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे भाजी विक्रेते रस्त्याच्या कडेला प्रथम त्यांचे वाहन लावतात आणि त्याच्यापुढे भाजीचे दुकान मांडून अर्धा रस्ता अडवितात. त्यामुळे वाहनांना जाण्यासाठी अतिशय अरुंद सता उरतो. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणता उमेदवार पुढाकार घेणार आहे का?
Politics: भररस्त्यातील मोठे झाड कापले, कोण काही बोलले का?
शहरातील गुलमोहर रोडवरील शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओपासून जवळच असलेला एक मोठा वृक्ष काही दिवसांपूर्वी तोडून टाकला. दिवसभर या झाडाची कटिंग करून लाकडांची वाहतूक केली गेली. या परिसरात काही सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक राहतात. रस्त्यातील झाड तोडल्यानंतरही मात्र, कुणीच काही बोलले नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या उद्यान विभागानेही या वृक्षतोडीची दखल घेतलेली दिसत नाही. या विकाणी तोडलेल्या झाडाचे खोड न्यायाव्या प्रतीक्षेत आहे.
Breaking News: Where have our questions gone in your politics














