Breaking News | Ahilyanagar: नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
जामखेड : शहरवासीयांनी आपल्या सर्वांवर विश्वास टाकून मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून दिले आहेत. शहराच्या सर्वागीण विकासासाठी आता सर्वांनी एकत्र येऊन जनतेचे सेवक म्हणून काम करा. निधी मिळवून देण्यासाठी मी सक्षम असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
जामखेडच्या नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी यांनी नववर्षाच्या सुरुवातीला गुरुवारी (दि. १) पदभार स्वीकारला. नगराध्यक्षांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तहसीलदार धनंजय बांगर व मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या उपस्थितीत प्रांजल चिंतामणी यांनी अधिकृत पदभार स्वीकारला. यावेळी शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात होते. बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. नगराध्यक्ष चिंतामणी म्हणाले, की जामखेड शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी सभापती शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाला जामखेडकरांनी एकहाती सत्ता दिली, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा फेटा बांधून शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.
Breaking News: Work as a servant of the people Ram Shinde














