आजचे युग हे स्पर्धेचे युग मानले जाते. आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपणास प्रचंड स्पर्धा पहावयास मिळते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी एका गोष्टीला अनन्यसाधारण महत्व असते, ती गोष्ट म्हणजे आपल्यातील गुणवत्ता. निश्चितच स्पर्धा परीक्षेतून गुण, कौशल्य, व्यक्तिमत्व, मेहनत व दृष्टीकोन यासारख्या घटकांचे शास्त्रशुद्ध मूल्यमापन केले जाते.
आजच्या स्पर्धेच्या या युगामध्ये इंग्रजी भाषेला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेचा प्रभावीपणे वापर होताना दिसत आहे. इंग्रजीचे जागतिक महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही कारण इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा बनली आहे.
इंग्रजी भाषेचे वाढते महत्व लक्षात घेता आज बहुतेक सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये ( Competitive Exams) इंग्रजी भाषेचा अंतर्भाव असलेला आपणास दिसून येतो. इंग्रजी व्याकरण (Grammar) हा स्पर्धा परीक्षांचा आत्मा आहे. व्याकरणाचा अभ्यास हा भाषाशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
Global English Creativity या वेबसाईटच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा केंद्रस्थानी ठेऊन इंग्रजी व्याकरण (Grammar) साध्या व सोप्या पद्धतीने अभ्यासण्यासाठी हे वेबपेज तयार करण्यात आले आहे. इंग्रजी व्याकरणाशी संबंधित जवळपास सर्व घटक या वेबपेजमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. निश्चितच हे वेबपेज सर्वांसाठी एक प्रकारची संजीवनीच ठरणार आहे.
Click on the Topic
↓
लवकरच प्रत्येक घटकावर स्वतंत्र सराव प्रश्नसंच देण्यात येईल
वेगवेगळ्या प्रसंगी व वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये इंग्रजी बोलण्यासाठी विशिष्ठ वाक्य अथवा शब्दसमूहाची आवश्यकता असते. असे म्हटले जाते कि “First Impression is the Last Impression”… अर्थातच वेगवेगळ्या प्रसंगी व वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये इंग्रजी बोलण्याची प्रभावी सुरवात कशी करता येईल या दृष्टीने आम्ही अनेक प्रासंगिक पाठ तयार केलेले आहेत. निश्चीतच हे सर्व प्रासंगिक पाठ आपणास प्रभावीपणे इंग्रजी बोलण्यासाठी एक संजीवनी ठरणार आहे. |
DOWNLOAD DAILY GRAMMAR WORKSHEETS |